STORYMIRROR

Priyanka Shinde Jagtap

Inspirational

4  

Priyanka Shinde Jagtap

Inspirational

स्वप्न होते माझे

स्वप्न होते माझे

1 min
279

स्वप्न होते माझे

साहित्यिका व्हायचे,

शब्दांच्या पावसाने

रसिकांना भिजवायचे ॥१॥


नवखी होते मी

ओंजळीत स्वप्नांच्या,

स्थान व्हावे पक्के

गर्दीत दिग्गजांच्या ॥२॥


कोर्‍या कागदावरती

साठ अक्षरे कोरली,

आणि काय सांगू?

त्यांची कविता झाली ॥३॥


बरसले घन आशयी

हृदयात रसिकांच्या,

हळूच पडले प्रेमात

ते माझ्या शब्दांच्या ॥४॥


साहित्याच्या क्षेत्रात

वाट नवी सापडली,

पाहिलेल्या स्वप्नांना

सिद्धी प्राप्त झाली ॥५॥


अथांग आहे आकाश

भरारी अजून घ्यायची,

पुस्तकांच्या स्वरूपात

आस आता जगण्याची ॥६॥


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational