स्वच्छता ( अभंग रचना )
स्वच्छता ( अभंग रचना )
आपले आरोग्य I आपल्याच हाती l
स्वच्छता राखती | घरोदारी ॥ १ ॥
वैयक्तिक चला I स्वच्छता राखू या |
आणि पळवुया | रोगराई ॥ २ ॥
गाडगेबाबांचे | अंगीकारा येथे I
विचारच जेथे | स्वच्छतेचे ॥ ३ ॥
परीसर सारा | स्वच्छ तो करावा |
मग चमकावा | लख्ख सदा ॥ ४ ॥
घाण नको काही | आसपास अशी I
दिसावी ना माशी I उडताना ॥ ५ ॥
असाध्य जगती I काहीच ते नाही I
उघडून पाही I दोन्ही डोळा ॥ ६ ॥
