STORYMIRROR

Prachi Kulkarni

Inspirational

4  

Prachi Kulkarni

Inspirational

उर्मी

उर्मी

1 min
385

नाही पालटत कूस, एकही दिवस

क्षणातले, पळातले, किती मोजावे प्रवास


भिंतीआड बंद झाली, पाखरांची फडफड

माणसाला दिसे, माणसाची पडझड


आठवावे कितीदा, बसलो निवांत

प्रश्नाला उत्तर नाही, मन करी आकांत


अर्थाला नाही, उरला तो अर्थ

का उगा वाटे, सारे काही व्यर्थ


काय करावे रोज, पुसावे कोणाला

मरण्याची भीती, का वाटते स्वप्नाला


नको होऊ कासावीस, जीव उगाची तुटतो

साथीला साथ देऊ, प्रश्न इथेच सुटतो


वाजेल पुन्हा पावा, गाईल पुन्हा नदी

अंतरात फक्त, पालवीची उर्मी हवी


थांब इथे, बघू जरा ऐलतीर पैलतीर

विश्वासाच्या फुलाने लावू सुखाचे अत्तर


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational