STORYMIRROR

Prachi Kulkarni

Inspirational Others

5.0  

Prachi Kulkarni

Inspirational Others

पुस्तके

पुस्तके

1 min
277

पुस्तके सांगतात आपल्याला, 

कथा जुन्या काळाची, घडून गेलेल्या घटनांची

कधी राजाची, कधी राणीची, 

कधी राजकारणातील आणीबाणीची, 


हात धरून नेतात, शब्दांच्या दुनियेत

जादू दडलीय, पानांच्या किमयेत.. 


पुस्तके म्हणजे आनंदाच्या कुप्या आहेत

परत परत लिहाव्यात, अशा ज्ञानाच्या पाट्या आहेत, 


म्हणून म्हणते, जपावे हे वाचनवेड

त्यांच्याबरोबर जुळतील, छंदांचे पेड.. 


द्यावीत - घ्यावीत पुस्तके आहेरासाठी

परंपरा जपून, येणाऱ्या पिढीसाठी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational