STORYMIRROR

Prachi Kulkarni

Others

4  

Prachi Kulkarni

Others

चांदणस्वप्न

चांदणस्वप्न

1 min
383

चांदण्यांच्या रात्री ह्या,चंद्र कवेत माझ्या

फुलांचे सुके गालिचे, उरात कळ्या माझ्या


जखमी माझ्या मनाचा, मीच थांग घेता

श्वासातली कळ आली ओठात माझ्या


हलकेच नीज येते अन् पापणी थरारे

अजूनही जाग, डोळी स्वप्न माझ्या


मिठी ही दुःखाची , जराशी सुटावी

आसवात ओल्या , भिजला आनंद माझा


Rate this content
Log in