STORYMIRROR

Prachi Kulkarni

Others

4  

Prachi Kulkarni

Others

प्रयोग

प्रयोग

1 min
349

जन्मापासून सुरू होतो 

रंगांचा खेळ

कधी नात्यांच्या गुंत्याचा

तर कधी स्वतःतल्या स्वचा

वठवावी लागतात पात्रे

आणि मुरडाव्या लागतात इच्छा

चढवावे लागतात वेष 

इतरांच्या इच्छेचे

जीवन हे ही नाटकच

आपण अभिनेता,

प्रकाश , संगीत , घंटा

वाजवणारे दुसरेच


Rate this content
Log in