STORYMIRROR

Prachi Kulkarni

Abstract

3  

Prachi Kulkarni

Abstract

यात्रा

यात्रा

1 min
282

तुम्ही असा वा मी ,

आपण सगळेच प्रवासी

दिगंताच्या वाटेवरचे...

 पाप पुण्याचा घडा

 घेऊन डोक्यावरती

चालतो पाऊलवाट

कित्येक जन्माची

हलकेच हाक येते

तिमिर भरल्या नभाची

पण साथ सुटत नाही

चंद्रातल्या प्रकाशाची

तृप्तीचे दागिने ल्यालेली

नवप्रभा भासे अशी

ही वाट सांगते

कहाणी प्रवासाची


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract