स्वप्न
स्वप्न
1 min
161
सगळीच स्वप्न नसतात खरी
काही गुडूप दडून बसलेली उरी,
कधी पाणावतात डोळ्यात
कधी ओघळतात आसवात
पण ती आहेत..
आपल्या आत आहेत
थोडीशी कच्ची
थोडीशी जुनी
थोडी नव्या जाणिवेची
तर काही अशीच ... मिटलेल्या कळीची
ती आहेत म्हणून तर ,
गर्भारपण आहे अजूनी मनाला
रोज नवे धुमारे येतात जन्माला,
स्वप्न आहेत.. म्हणून तर
पूर्णत्वाचा ध्यास आहे
चालण्याचा विश्वास आहे
ती आहेत म्हणून तर
या देहात श्वास आहे