STORYMIRROR

Prachi Kulkarni

Tragedy

4  

Prachi Kulkarni

Tragedy

सख्या रे

सख्या रे

1 min
419

ती असली की घराला घरपण येतं

आणि तो असला की घराला भरलेपण येतं

रोज रोज,

दिवसभर नसताना तू, घर वाट पाहते

संध्याकाळची चाहूल देत तुझे येणे होते

आता मात्र,

तू जवळ नाहीस अन् हातात हात नाही

आठवांच्या चांदण्या अन् जीवाची लाही लाही

म्हणूनच रे सख्या,

देवाजवळची सांजवात , उदास भकास भासते

शुभंकरोतीच्या स्वरासवे , सय मनात दाटते



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy