कोकिळगान
कोकिळगान
कोकिळेची कुहूकुहू,
पडता माझ्या ग कानी,
ऐकून मंजुळ वाणी,
धुंद झाले मी साजणी.
पहाटेचा गारवा तो,
झोंबू लागला अंगा,
मनामधी दाटे भक्ती,
पांडुरंगाचे अभंगा.
अभंग पडती कानी,
मधुर ते गोड किती,
कोकिळेची कुहूकुहू,
मनासही सुखावती.
झाडाच्या फांदीवरती,
किलबिलाट पक्ष्यांचा,
मंत्रमुग्धाने ऐकती,
आवाज कुहूताईचा.
पहाटेची ती शांतता,
शांततेमधील गाणे,
ऐकुनिया मनामधे,
फुलती नवे तराणे.
