STORYMIRROR

Savita Jadhav

Action Classics Inspirational

3  

Savita Jadhav

Action Classics Inspirational

ही वाट दूर जाते

ही वाट दूर जाते

1 min
283

ही वाट दूर जाते,

नागमोडी घाटातून,

घाट संपताच दिसे क्षितीज

डोकावताना थाटातून...!!


जीवन सुध्दा असेच, 

घाट वळणाचा खडतर,

तोच गाठेल यशाचे शिखर,

चालत राहिला जो निरंतर...!!


स्वप्नामधील गावा,

ही वाट दूर जाते,

ध्येय निश्चित असतं तेव्हा,

ही वाट मार्ग यशाचा दावते...!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Action