वॄक्षवल्ली सखे सोबती
वॄक्षवल्ली सखे सोबती
वृक्षवल्ली सखे सोबती,
देई प्राणवायू जगण्यासाठी,
अविभाज्य घटक असे जीवनाचा,
संजीवनी साऱ्या सृष्टिसाठी.
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
वृक्षवल्ली सखे सोबती,
धनधान्याने भरते ओटी,
फळाफुलांना बहर येतसे,
डोळ्याचे पारणे जणू फिटती.
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
वृक्षवल्ली सखे सोबती,
करती पशुपक्षी येथेचि निवारा,
उन्हातान्हात थकित वाटसरू,
घेती वृक्षछायेखाली निवारा.
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
वृक्षवल्ली सखे सोबती,
करावे कौतुक तयाचे किती,
सारे मिळूनिया प्रण करू या,
जपू या आपण आपली वनसंपत्ती.
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
