येरे येरे पावसा
येरे येरे पावसा
1 min
275
येरे येरे पावसा
होवो सारे चिंबचिंब
येरे जरासा असा
सुटो मातीचा सुगंध
कर बरसात अशी
भिजू देत सारी धरा
चिंब भिजण्याची मजा
लूटू दे आनंद खरा
उंच धबधबा जणू
शुभ्र तो फेसाळताना
मन मोहूनिया जाते
बघू दे कोसळताना
येरे येरे पावसा
भिजू देत आता खूप
भरू दे तुडूंब तळे
पालटावे सॄष्टीरूप
