STORYMIRROR

Savita Jadhav

Classics

3  

Savita Jadhav

Classics

श्रावणसरी

श्रावणसरी

1 min
532

श्रावणातील रूप मनोहर,

नयनरम्य भासे गोजिरे,

टपटप करती टपोरे मोती,

दिसती पर्णफुलावरी साजिरे.


सरसर बरसल्या श्रावणसरी,

सरींनी धरित्री झाली ओली,

निसर्ग नटला हिरवाईने,

पांघरल्या नवचैतन्याच्या शाली.


मनास भावे मृदूगंध सुवासिक,

इंद्रधनू खुणावितो क्षितीजावरी,

बेधूंद होऊनी फुलतो मोर पिसारा,

ताल धरितसे जणू श्रावणसरी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics