STORYMIRROR

SATISH KAMBLE

Inspirational

4  

SATISH KAMBLE

Inspirational

ज्ञानदीप

ज्ञानदीप

1 min
247

शिल्पकार हो संविधानाचे

बाबासाहेब झाले,

ज्ञानाच्या जोरावर

भारत देशाला तारले


ज्ञानाचा ते अगणित खजिना

विदेशातही रोवला झेंडा,

रात्रंदिनी अभ्यास तो करूनी

अज्ञानाला शिकवला धडा


हालअपेष्टा सोसूनी त्यांनी

स्वतःला घडविले,

ज्ञानाच्या जोरावर

भारत देशाला तारले


कष्टाला मर्यादा नाही

शिकण्याला मर्यादा नाही,

अभ्यासाविन नुसती बडबड

कधीच त्यांनी केली नाही


अपमानाचे घाव झेलूनही

मागे कधी ना सरले,

ज्ञानाच्या जोरावर

भारत देशाला तारले


अर्थशास्त्र ते जगा शिकवले

लेखणी चालवली ती सरसर,

मानवतेला धर्म मानूनी

उंचाविला प्रगतीचा हो स्तर


निरनिराळ्या धर्मांनाही

एकसंघ बांधले,

ज्ञानाच्या जोरावर

भारत देशाला तारले


पक्षपात कधी केला नाही

दीनदुबळ्यांचे बनले वाली,

एकजुटीचे महत्त्व पटवूनी

हाती दिल्या शिक्षणाच्या ढाली


सार्‍या विश्वाने हो त्यांना

ज्ञानदीप मानले,

ज्ञानाच्या जोरावर

भारत देशाला तारले


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational