STORYMIRROR

SATISH KAMBLE

Others

3  

SATISH KAMBLE

Others

मानाचा मुजरा

मानाचा मुजरा

1 min
250

अपयशाच्या काळोखातूनी घेतली उंच भरारी

पादाक्रांत केली त्यांनी यशाची शिखरे सारी


मनापासूनी केली त्यांनी जनसेवा अन् देशसेवा

कधी ईर्ष्येने केला नाही प्रतिस्पर्ध्यांचाही हेवा


संकटकाळी धावून येती देशा देती आधार ते

मदतीला कर्तव्य मानणारे थोर असे दानशूर ते 


टाटा परिवारामध्येही त्यांना मानाचे हो स्थान

या परिवाराचा प्रत्येक सदस्य गातो त्यांचे नेहमी गुणगान


माणुसकी पण जपली त्यांनी शिकवली हो इतरांनाही

कार्य असे त्यांचे की दुनिया आदराने त्यांना पाही


हिर्‍यासारखे चमकून देखील प्रकाश पाडला गरिबा घरी

म्हणूनच त्यांना सलाम करते झुकूनी ही दुनिया सारी


Rate this content
Log in