STORYMIRROR

SATISH KAMBLE

Tragedy Others

3  

SATISH KAMBLE

Tragedy Others

आर्थिक हल्ला

आर्थिक हल्ला

1 min
285

हप्ता थकवला बॅंकेचा तर

लगेच दंड ते वसूल करती,

बुडवले बँकेने जनतेला

तरीही जनताच त्रास सोसती


पैशावर आमच्या बँक ही वसली

पालनपोषण आम्हीच केले,

जेव्हा होती गरज आम्हाला

दार मरणाचे तिने दाविले


धनाढ्य बनले चोर इथे किती

तरीही रूबाब त्यांचाच मोठा,

काहीही घडले तरी या देशात

सामान्य जनताच सोसते तोटा


चोरांस मिळते अभय इथे अन्

संन्याशाला मिळते फाशी,

चोरी करूनी चोर पळाले

स्थायिक झाले जाऊन विदेशी


पैसा घरी ठेवण्यास बंधने

बँकेत ठेवला तरीही धोका,

सामान्यांनी कसे जगावे

उत्तर असेल तर सांगून टाका


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy