संकटाने शिकवला अर्थ जीवनाचा
संकटाने शिकवला अर्थ जीवनाचा
पृथ्वीतलावर धुमाकूळ घातला
या कोरोना व्हायरसने,
क्षणात झाले कमी प्रदूषण
या विचित्र संकटाने
वाईट गोष्टींमधूनही काही
चांगले घडतच असते हो,
परंतु चांगल्या घटनांकडे
लक्षच आपले नसते हो
पैसा पैसा करणार्यांना
महत्त्व आता कळले जीवाचे,
नव्हता वेळ कुटुंबासाठी
सर्वस्व झाले कुटुंब त्यांचे
पैशाचाही माज उतरला
अर्थ खरा जीवनाचा कळला,
ऐष-आराम त्यागूनी जो तो
साधेपणाने जगू लागला
बंदिस्त झाला मानव सारा
किलबिल पक्ष्यांची कानी पडली,
संहारक मानवजातीला
विषाणूंची ताकद भारी पडली
संकट आले निघूनही जाईल
कालचक्र हे फिरवूनी जाईल,
भ्रमात जगणार्या मानवाला
अर्थ जीवनाचा शिकवूनी जाईल