एक सलाम
एक सलाम
तोडुनि शृंखला गुलामीच्या
दिशा दिल्या स्वातंत्र्याच्या
वर्णु किती गाथा शौर्याच्या
झेलूनि गोळ्या बंदुकीच्या
इथेच जन्मलेत वीर जवान
स्वातंत्र्याचे झेलून आव्हान
पत्करले देशासव हौतात्म्य
असा हा भारत देश महान
बापू स्वातंत्र्यवीर विनायक
सुभाषबाबू न् शूर भगतसिंग
खवळुनि उठले हे देशसेवक
फुंकले युद्धासाठीच रणशिंग
त्यागूनि काया गेले वीरगतीला
स्वतंत्र केले माझ्या भारतभूला
एक सलाम माझा वीरपुत्रांना
स्मरून त्यांच्या थोर कर्तृत्वाला
