सौंदर्य
सौंदर्य
सौंदर्य तू म्हणालास खूप सुंदर दिसतेस
मोहक डोळयांनी सारं काही बोलतेस
चेहरा रूपवान तुझा तरी भाळलो मी मनाच्या सौंदर्यावर
साथ तुझी कधी ना सोडणार हात हातीचा कधी ना सुटणार
मी ही हुरळून म्हणाले माझ्याहून तुला मन माझे भाळले
हे ऐकूनच तुझ्या प्रेमात पडले गुलाबी प्रेम आता बहरू लागले
नवनवीन स्वप्नं सजू लागले तुझ्यावरच्या प्रेमाने कोणा तिसऱ्याचं मन दुखावलं
त्याची नाही तर कोणाचीच नाही हे त्याने ठरवलं
विध्वंसक विचाराने तो उठला त्याचा आवडता चेहराच ॲसिडने पेटवला
षंढ लोकं उघड्या डोळ्याने बघत राहिली
मी त्याच्या सूडाच्या आगीत जळत राहिली
समाजमान्य सौंदर्य त्याने हिरावलं
मनाचं सौंदर्य तू नाकारलं
विद्रुप चेहरा पाहून तू पळ काढला
आधाराचा हात हातातून निसटला
माझा मार्ग एकलाच सुरू झाला
चेहराच संपला होता पण मन जिवंत होत
आत्मतेज माझं जग उजळवीत होत
रणरागिणी, दुर्गा बनून मीच जिंकले
शापित सौंदर्याहून आत्मिक सौंदर्यच श्रेष्ठ ठरले
