बरसात
बरसात
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
345
आठवते का टपोऱ्या थेंबांची बरसात
वाट अनोळखी नि हातात हात
नाही नाही म्हणत
पावसात भिजत दिलेली साथ
उमलती सुरुवात कोमल शहाऱ्यांची
अधरांची भाषा अन नजरेची जुगलबंदी
श्वासांची कहाणी श्वासांनीच ऐकलेली
गंधाळल्या भावनांनी दिलेली प्रेमाची कबुली
उठले वादळ मनी, मिठीत शांत झालेले
रीते काळीज हळुवार तुझ्यात विरलेले
भिजल्या क्षणांनी तुझ्या मनात घर केलेले
प्रीत वर्षावात नभ धरती सजलेले
आठवते का टपोऱ्या थेंबांची बरसात
वाट अनोळखी नि हातात हात
माझा तू न तू माझी म्हणत
मिलनाची जन्मोजन्मीची बांधलेली गाठ