स्त्री
स्त्री
1 min
895
स्त्री
विखुरलेलं एकटवण्याचं सामर्थ्य
तुझ्यात आहे
तू नको बनू कोणासारखं
तू जशी आहेस तशीच राहा
कणखर
घट्ट मातीत रोवलेलं मूळ जसं
आपल्यांसोबत आपल्यासाठीही जगत राहा
तुझ्यातल्या अस्सीम मायेचं पांघरूण
स्वतःभोवती ही ओढत जा
तुझ्यातल्या प्रेमातल्या वर्षावात तू भिजत जा
तू झगडत राहा, लढत राहा, हसत राहा,फुलत राहा
स्वतःवर प्रेम करत राहा
तू विझु देऊ नकोस कधी
स्वतःला, स्वतःच्या अस्तित्वाला
