STORYMIRROR

Sarita Sawant Bhosale

Abstract Tragedy

3  

Sarita Sawant Bhosale

Abstract Tragedy

कोरड्या प्रेमसरी

कोरड्या प्रेमसरी

1 min
279


मनास मनाचा कळलेला पाऊस

अलीकडे पडत नाही

कोरड्या प्रेमसरीचं ओझं आता

पेलवत नाही


आभाळाला कोसळता येतं

भरून आलं की

मनालाही हवा असतो खांदा

अश्रूंनी साद दिली की

नयनांना आताशा ती ऊब

जाणवत नाही


जखमा चिघळत जाई नव्याने

सैल होत जाई विणलेले धागे

सांधायचा प्रयत्न किती केला..तरीही

अंतरातले 'अंतर'

आता कुठल्याच सरींन मिटत नाही

मनास मनाचा कळलेला पाऊस

अलीकडे पडत नाही


Rate this content
Log in