STORYMIRROR

Sarita Sawant Bhosale

Inspirational

4  

Sarita Sawant Bhosale

Inspirational

तू ही घे क्षणभर विश्रांती

तू ही घे क्षणभर विश्रांती

1 min
325

किती ग तू करशील काळजी         

झळा तू सोसून आम्हाला प्रेम छाया देई

स्वतःला विसरून करतेस सगळ्यांची सरबराई

निवांत असते जग, तुझी मात्र एकटीची घाई

घेऊन जरा उसंत तुही घे क्षणभर विश्रांती


सकाळची सुरुवात सगळ्यांच्या डब्याने होई

संध्याकाळ मुलांच्या आवडीनिवडीत जाई

उद्याचे नियोजन तू रात्रीत करी

थकल्या जीवाला तू आराम कधी देेेई

घेऊन जरा उसंत तुही घे क्षणभर विश्रांती


विसरून दुःख स्वतःचे सदा तू हसी

लाड पुरवत सगळ्यांचे स्वतःच्या

हौसमौजेला मोडता घाली

नात्यागोत्यांचा भार तू एकटीच पेली

पाठीच दुखणं मात्र सहज लपवी

होऊ नकोस ग इतकी निष्काळजी

घेऊन जरा उसंत तुही घे क्षणभर विश्रांती


रूपाचा गर्व असेल तुज भूतकाळी

चिरतरुण तू अजूनही,कशाला दिसशी म्हातारी

आरशात जरा डोकावून बघ तोही म्हणी

सौंदर्याची खाण तू,स्वतःवरही जरा प्रेम करी

किती ग राबशील माय दिनरात घरासाठी

आमच्यात गुंतुनी होऊ नको तू तुलाच परकी

अस्तित्वाचा ठाव घेऊनी घे स्वतःस जिंकुनी

घेऊन जरा उसंत तुही घे क्षणभर विश्रांती


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational