आई
आई
1 min
204
मरणयातना सहन करून चिमुकल्याचा टाहो कानी
पडताच चेहऱ्यावर हास्य फुलणारी ती जननी
ठेच बाळाला लागता डोळ्यात पाणी येणारी ती वात्सल्यमूर्ती
वादळवाऱ्यात संरक्षणकवच बनणारी ती हिरकणी
संकटात सावरणारी ती सौदामिनी
आजन्म सोबत असणारी ती मातृत्वाची अखंड सावली
ती एक आई
