एकांत
एकांत
एक एकांतच मनाला खूप भावतो
अबोल मनाचा कप्पा इथेच उलगडतो
मुखवट्या मागची व्यथा हाच जाणतो
आपल्यांच्या गर्दीतही हाच फक्त माझा भासतो
चूक बरोबरची उकल हाच करतो
सुख दुःखाची गणितंही मांडतो
रंगात मिसळून बदलणारा हा नसतो
आपल्यातला परकेपणा इथे नसतो
श्वासांचा अर्थ यास उमगतो
दाटून येतो कंठ अन अश्रूंचा पाऊस पडतो
मिठीत सामावून घेण्यास हाच एक असतो
दिखाव्याच्या दुनियेत सखा सोबती हाच वाटतो
एक एकांतच मनाला खूप भावतो