STORYMIRROR

Sarita Sawant Bhosale

Tragedy

3  

Sarita Sawant Bhosale

Tragedy

वेदना

वेदना

1 min
345


वेदनेच्या तळाशी आहेत जखमा ठसठसणाऱ्या

ना दिसणाऱ्या, ना बोलक्या

हसत गोंजारत हळुवार दबलेल्या

 मुखवट्यावर मुखवटे चढवून

 आयुष्य रंगवत सजलेल्या...


जखमानाही हल्ली त्यांचा रंग कळेना

लाल, निळा,पिवळा,काळा, पांढरा

कोणता पेलावा समजेना

सरमिसळून जावं की एकटंच राहावं 

मनःस्थितीच्या कडीतून सुटकेचा मार्ग सुटेना


वेदनेनेही किती बोलावं,किती रडावं

डोळे, कान उघडून समजणारं तिलाही दिसेना

भरगच्च गर्दीत तिच्या आवाजाला दाद मिळेना

हसत खपलीवर खपली चढतच राहिली

खरी 'मी' का 'ती' तिलाच उमजेना


गोठून जखमा भावनांचा इथे लिलाव झाला

खऱ्यापरी खोट्याचाच मोह अधिक झाला

चुकले काही की सारेच चुकले येथे

संवेदनाचा हलकेच लोप झाला


Rate this content
Log in