STORYMIRROR

Nita Meshram

Inspirational

4  

Nita Meshram

Inspirational

संस्कार

संस्कार

1 min
472

संस्काराचे मोती मानवा 

जप तुझिया हृदयाशी 

विसरू नको मनास घडवी

संस्कारांची माती 


अज्ञानाच्या अंधारावर 

ज्ञानाचे शिल्प जैसे उठून दिसे

शिल्पकार जैसा पाषाणाला

संस्कारी सुंदर शिल्पे


आई जैसे अपत्ये संस्कार करी

जगण्यास देई बळ नवे 

शिक्षक विद्यादान करी

विद्यार्थी घडवीत आनंदे


गावे प्रभूनाम नित्य

वंदावी माता-पित्यांची पाऊले

संस्काराचे मोती जपूनी

जीवन जगावे सुंदर हे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational