STORYMIRROR

Savita Jadhav

Inspirational

4  

Savita Jadhav

Inspirational

वसुसंवर्धन

वसुसंवर्धन

1 min
23K

सजीव सृष्टी अवतरली 

वसुंधरा राणीच्या पोटी

हिरवाई ने बहरलेली

होती जणू तिची ओटी


वसुंधरा माता आपुली

करूया सारे तिचा सन्मान

मिळे झाडवेलीतून तिची सावली

प्रदूषण रोखा ठेवा स्वच्छता छान


वसुंधरेच्या पाठीवर

रहातात सारे खुशाल

थांबवू तिला होणारे त्रास

करूया जरा तिचाही खयाल


वसुंधरा उचले साऱ्यांचा भार

तिच्यासाठी काही तरी करा

जगायचे असेल आरोग्यदायी जीवन

थांबवा अस्वच्छतेचा पसारा


झाडे लावा,झाडे जगवा,

मिळू दे खूप सारा सू्र्यप्रकाश

करूया संवर्धन वसुंधरेचे

घेऊ देत तिलाही मोकळा श्वास.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational