ये रे ये रे पावसा
ये रे ये रे पावसा
आभाळाच्या सरी
पळती आमच्या मनाच्या लहरी
अद्भुत नाते तूझे नी माझे पावसारे
पावसारे अजून जोमात ये नं रे ।। 1 ।।
तेंव्हाच लता बिलगती बुंध्याला
ते दवबिंदू दिसती दागिन्या समान
धुंद वाऱ्याच्या लहरीने
आनंदित होतील मने ।। 2 ।।
लोंबत्या वेलींवरची फूले
हासती आमच्या मिलाफास
घट्ट मीठी मारुनी माळीन
तीच्या केसात जाई,जुई,अन मोगरा ।। 3 ।।
सवे एकत्र येऊनि
म्हणतील सारे तूझे नि माझे
अदभूत नाते पावसारे
अजून जोमात ये न पावसारे ।। 4 ।।
