मरण
मरण
मरण मी पाहिले
स्वतःचे नाही पण दुसऱ्याचे नक्कीच पाहिले,
माणूस मरणाच्या दारात जात असताना त्याच्यात होणारे बदलही पाहिले.
कधी ते स्वस्थ बसून राहिलेले पाहिले,
तर कधी ते अस्वस्थ होतानाही पाहिले.
कधी ते आपल्याच धुंदीत गप्प बसून राहिले,
तर कधी कोणाला काहीही बोलले.
त्यांचे त्यानाच ना काही कळले,
कधी ते मरणाच्या वाटेकडे वळले.
जणू काही त्यांना मारणानेच खुणावले,
म्हणूनच तर त्यांनी डोळे मिटून घेतले.
जवळ असताना काहीच नाही जानवू दिले,
पण ते मात्र हे जग सोडून निघून गेले.
प्राण जाताना ना कशाचे आवाज आले,
ना आत्मा निघून जाताना काही दिसले.
चालता बोलता जीवन हे हरवून गेले,
काही क्षणातच सर्व काही संपून गेले.
स्वतःचे नाही पण दुसऱ्याचे पाहिले,
खरंच मरण मी पाहिले.
