मिठी...
मिठी...
मिठीत तुझ्या येता
धडधड हृदयाची वाढते,
स्पर्शाने तुझ्या त्या
काया ही ओथंबून जाते.
प्रेमात तुझ्या हे
मन माझे
चिंब चिंब होते,
अन हृदयास तुझ्या ते
अलगद बिलगून बसते.
जीवन हे सारे
असेच मिठीत राहू,
बंद नयनातही
ती स्वप्नं उद्याची पाहू.

