STORYMIRROR

Pravin Shinde

Inspirational

3  

Pravin Shinde

Inspirational

नातं

नातं

1 min
132

 नात्यात असावी माया आणि विश्वास 

नात्यात नसावा दुरावा

नात्यात असावा आपलेपणा

जसा खोल सागरासारखा||१||

येतात संकटे हजार

जातात संकटे हजार

पण लक्षात राहतात

संकटात साथ सोडणारे हाथ ||२||

नात्यात असावा विश्वासाचा ओलावा

जसा कृष्ण - अर्जुनाने जपला

नात्यात असावा मैत्रीचा धागा

जसा शंभू राजे - कवी कलशांसारखा||३||

नात्यात असावा प्रेमळ बंधूभाव 

जसा ज्ञानेश्वर,निवृत्ती, सोपान व मुक्ताई यांनी जपला

नातं असावं जगाला प्रेम देणार 

जसं साने गुरुजींनी दिलं ||४||

नात्यात असावी आभाळभर माया

सगळ्यांच्या जीवाला घोर लागावा 

नात्याचा ओलावा आयुष्यभर रहावा

त्यासाठी जपा हा सुंदर धागा ||५||



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational