तुला पाहून
तुला पाहून
तुला पाहून जीव खुलतो
तुला पाहून जीव भुलतो
बघता तुझी अदा
जीव घायाळ होतो
तूझ्या नजरेची जादू
करते बेकाबू
जीव होतो खाली - वर
जेव्हा होते नजरे आड तू
आडोशाला जाऊन करू गप्पा - गोष्टी
होतील का स्वप्न पूर्ण येईल का पुष्टी
तुझ्याविन जीव अपूर्ण आता
भरशील का रंग माझ्या आयुष्यात आता
तुला नजरेआड नाही ठेऊ शकत
मनाची घालमेल तुला नाही का कळत
होशील का माझी राणी ग
तुला पाहून जीव खुलतो ग
तुला पाहून जीव खुलतो ग...

