STORYMIRROR

Pravin Shinde

Inspirational

3  

Pravin Shinde

Inspirational

काय करू महाराज

काय करू महाराज

1 min
206

काय करू महाराज काहीच कळत नाही

जिकडे तिकडे जाळपोळ काहीच उमजत नाही

आम्ही तुमचं नाव ऐकलं की 'जय' म्हणतो

एखाद्याला उध्वस्त करायला शर्यत लावतो


तुमची शिकवण होती भाजीच्या देटाला हात लावायचा नाही

आम्ही मात्र आमच्याच बळीराजाची वाट लावली


तुमची शिकवण होती सगळे समान

आम्ही म्हणतो आमचा झेंडाच फक्त महान

कोणी म्हणतो भगवा माझा कोणी म्हणतो निळा माझा

रंगा रंगात विखुरलो कोणाला कळेना तिरंगा माझा

 

तुम्ही स्वराज्यासाठी टाचा झिझवल्या

आमच्या नाही पचनी पडल्या

नाही कळला तुमचा अट्टाहास

नाहीतर निघाला नसता धूर आसमंतात


 काय करू महाराज काहीच कळत नाही

 एवढंच वाटतं तुम्ही यावं परत खाली

मिटावी सगळ्यांची दुरी

निघावी इथेही सोन्याचा धुरी

आपलेपणा वाढावा माणूस माणूस म्हणून जगावा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational