स्वतःची लढाई
स्वतःची लढाई
धरतीने कधी वाट पहिली का
ढगांच्या सावलीची ?
किनाऱ्याला वाटली का
कधी भीती सागराच्या लाटांची ?
कधी वाऱ्याने संगत केली का
सुकलेल्या पानांशी ?
फुलाने अपेक्षा केली का कधी
काट्याकडून आधाराची ?
अशीच लढाई आहे गड्या
स्वतःच्या आयुष्याची
इथे फक्त एकट्यानेच लढायचं
इथे फक्त एकट्यानेच लढायचं