एक एक पाऊल टाकत हाय
एक एक पाऊल टाकत हाय
दुःख माझं डोई जड झालंय
मार्ग काही सुचत न्हाय
संसाराच्या गाड्या साठी
एक एक पाऊल टाकत हाय
कसा करू सामना या
नशिबाच्या खेळाचा
खेळ मांडला भवताली
कोण येईना सावराया
आता नकोसं वाटतंय जीनं
पण येतात समोर माझी चिमणी पाखरं
डोळ्यात डोळे घालून त्यांच्या
होईन आधार माझ्या चिमुकल्यांचा
वाटा आहेत खच - खळग्यांच्या
आता नाही डरणार कोणाला
नाही घेणार आता निर्णय टोकाचा
होईल कष्ट सोसेल झळा विचार नाही आता दुनियेचा
दुःख झाले सोबतीला तरी
आता एक एक पाऊल टाकत हाय
आता एक एक पाऊल टाकत हाय
