कोण आपलं कोण परकं
कोण आपलं कोण परकं
कोण आपलं कोण परकं
हे वेळ आल्यावर कळतं
कधी झालेच वाद तर
जरा शांत राहून बघा
जो तुमचा आहे तो परत येईल
जो परका आहे तो निघून जाईल
जो तुमचा आहे तो मनवेल
ज्याला गरज नाही तो पाठ फिरवेल
वर - वरची माया दिसते तेव्हा
कठीण काळ समोर येतो जेव्हा
चांगलं असल्यावर सगळेच येतील
वाईटात भले - भले पळतील
येतील तुझे ही दिस
नको होऊ कासावीस
