STORYMIRROR

Vishal Puntambekar

Inspirational

3  

Vishal Puntambekar

Inspirational

एशियन गेम्स

एशियन गेम्स

1 min
153

येतो हा एकदा वर्षांनी चार 

एशियन गेम्सचा थरार

१९ व्या गेम्सच्या यशाचे सार

भारताने केले १०० पार


युद्धभूमी ठरली चीनच्या हंग्झाऊची

तारीख होती सप्टेंबर - ऑक्टोबर ची

यापूर्वीची सर्वोच्च कमाई होती ६९ ची

यावेळी लयलूट केली १०७ पदकांची

फलप्राप्ती क्रिडापटूंच्या कठोर मेहनीतीची

अभिमानाने फुगली छाती हरेक भारतीयाची


सुवर्ण लक्ष भेदत पाया रचिला नेमबाजांनी

विस्तारीला आवार मग मैदानी खेळांनी

स्तंब उभारीला धनुधारी व इनडोअर गेम्सनी

कळस केला तो आपल्या सांघिक खेळांनी

ध्वज फडकवीत ठेवीला सहभागी खेळाडूंनी


देश आपला आहे मोठा

गुणवत्तेला नाही येथे तोटा

राजकारण्यांचा हस्तक्षेप कमी थोडा

अव्वल स्थानावर धावेल आपला घोडा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational