STORYMIRROR

Vishal Puntambekar

Inspirational Others

3  

Vishal Puntambekar

Inspirational Others

वारी पंढरीची

वारी पंढरीची

1 min
139

वारकर्‍यांची पंढरीकडे पाऊले वळली

त्रंबकहून निवृतीनाथांची घेऊन सावली

आळंदीतून निघाले ज्ञानेश्वर माऊली

वाटेत देहुच्या तुकोबांची साथ लाभली


वाटेत घेत गोल रिंगणांची मजा

भक्तीशिवाय भाव न मनी दुजा

न करता मोठेपणाचा गाजावाजा

भेटीची आस घेऊन निघाली प्रजा

साध्य एकच, पंढरीचा कानडा राजा 


तिची गोष्टच काहिशी न्यारी

भक्तिरसात एकरूप सारी

विठुनामात दुमदुमली पंढरी

आराध्य पांढुरंग उभा विटेवरी

विशाल ठेवी मस्तक चरणावरी

सर्व विश्वात एकदम भारी

आषाढातली पंढरपूरची वारी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational