नक्की कोण असतात हे मित्र
नक्की कोण असतात हे मित्र
नक्की कोण असतात हे मित्र
मनात घर करून राहतात मात्र इतरत्र
जीवनाच्या वर्षातली पावसाची नऊ नक्षत्र
नसतील जर ते, आयुष्य होईल गलितगात्र
यांना नाव दुसरे आहे दोस्त
त्याच्या सहवासात सर्वकाही मस्त
महागडे असतात हे, मैत्री नाही स्वस्त
हो पण दुःखापेक्षा सुखच देतात जास्त
मराठीतला सखा, हिंदीतले यार
संकटात सोबतीला नेहमी ते तयार
झेलतील संगतीने तुमच्यावरचे वार
रखरखत्या जीवनात पाण्याचे तुषार
चला घालवू रोजच्या आयुष्याचा शिण
एकत्र बसूया ही आहे इच्छा
योगायोगाने आज आहे मैत्रीचा दिन
माझ्याकडून तुम्हाला विशाल शुभेच्छा
