STORYMIRROR

Vishal Puntambekar

Inspirational

3  

Vishal Puntambekar

Inspirational

स्वामीकार्य

स्वामीकार्य

1 min
5

भक्तीचा तो अविस्मरणीय सोहळा

स्वामीसेवकांचा भरला होता मेळा

ठीकठिकानाहून झाले भाविक गोळा

सांभाळून आपल्या कार्यालयीन वेळा


सुमन हाईट्स दुमदुमली भक्तिरसात

स्वामीभक्ती भिनभिनली नसानसात

अहंपण सरले आम्हा सर्व भक्तांचे

श्री स्वामी समर्थ हे दैवत आमचे


सुरवातीला चिंता अन्न उरेल याची

वाढती गर्दी पाहून चिंता पुरेल याची

शेवटी ना उरले अन् व्यवस्थित पुरले

प्रत्यक्ष अन्नपूर्णेने आम्हा तारले


कार्यसिद्धतेने धन्य झाला विशाल

धगधगती ठेवणार भक्तिरूपी मशाल

असुद्या पाठीवर सहकार्याची शाल

स्वामीकार्यात तुम्हीच आहात ढाल


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational