STORYMIRROR

Vishal Puntambekar

Inspirational

4  

Vishal Puntambekar

Inspirational

शिवशंभुराजा

शिवशंभुराजा

3 mins
11

अत्याचार होऊन नाही ते हळहळले 

यातना होऊनही नाही ते कळवळले 

धर्म न सोडण्या मृत्युला कवटाळले

धर्मवीराच्या त्यागाने रक्त मात्र सळसळले


शिवरायांच्या कार्याला असता पुढे जात

स्वराज्य रक्षण्या केली शत्रुंवर मात

वाघाच्या जबड्यात हात घालून मोजे दात

स्वकियांच्या फितुरीने मात्र केला त्यांचा घात


गद्दारीचा शाप लागलाय या महाराष्ट्राच्या मातीला

सल त्याची अजुनही मराठी माणसाच्या मनाला

राष्ट्रसंरक्षणाची आहे महाराष्ट्राची धमक

फुट टाळणे हेच आपल्या यशाचे गमक


कालच्या दिवशी झाला शंभूराज्यांचा राज्याभिषेक 

धाकल्या राजाच्या गौरवाचा सोहळा होता तो एक

या दिवशी कळकळीची विनंती करतो विशाल 

या मातीत धगधगत राहू राष्ट्रप्रेमाची मशाल


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational