STORYMIRROR

Vishal Puntambekar

Romance

3  

Vishal Puntambekar

Romance

चटक चांदणी, तू हृदयचोर

चटक चांदणी, तू हृदयचोर

1 min
117

साजिरे तुझे देखणे रुप

वाढविते माझा प्रेमाचा हुरुप

पुरणपोळी वर जसे साजुक तूप 

स्वादिष्ट चव तुझ्या रूपाची खूप


माझिया मना प्रफुल्लित करते

रुक्ष आयुष्य माझे तू बहरते

तनामनात रोमांच जागा करते

चंचल मन तुझ्यावर स्थिरावते

तुझ्यापुढे माझे मी पण हरवते


तू आहेस पौर्णिमेची चंद्रकोर

रूपकिरणांनी तृप्त मी चकोर

वेडा मी तुझा असे निरागस पोर

चटक चांदणी, तू हृदयचोर


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance