जीवन अंगण
जीवन अंगण
खेळण्या बागडण्या हवें
छोटेसे प्रांगण एक सशक्त
खेळतीलं मुलें हर्षाने तिथे
मारतं उड्या मनसोक्त
आजच्या नवं पिढीमध्ये
बालपण तर हरवलेचं
स्पर्धा किती असंख्य त्यां
जणू खेळ अंगण मोडलेचं
मोठ मोठ्या ह्या इमारती
व्यवहारिक जग हे झालें
दिलें आमंत्रण आजारांना
चालणे सर्व विसरून गेलें
गाड्या इंजिन सर्व आलें
वातावरण हे दूषितं झालें
निसर्ग जणू हा नष्ट केलां
पण जीवनालां किती मुकलें
कळेनां कुणालां कसे हे
समतोलं राखण्या जीवनाचे
रासायनिक सर्व जग हे झाले
खटके उडालें मग आरोग्याचे
बदल नको हा निसर्गातं
बदल घडवूया जीवनातं
नष्ट करुनी उत्पत्ती नकों
अविचारं मिश्रू नयें विज्ञानातं
