जीवन प्रवास
जीवन प्रवास
1 min
15
कसा किती कुठे असेल
जीवन प्रवास कुणाचां
ठिकाणी पोहचेल कां
ठावं कुणा नां परतीचां
सामनाच्या यादीत असते
किती दिनांचे नियोजन
धगधगीच्या जीवनामध्ये
निघून जातात निवांत क्षण
विसावा कुणालाचं नसे
पळतां पळतां दुनियेत
थकून भागून जाई जेंव्हा
नसते कुणी मग सोबतीत
जपावे जाणावे खरे सुख
भटकू नये मनाच्या धुंदीत
आयुष्य जावून मिळते मग
बेभान होऊन धूळमातीत
