नियती
नियती
विश्वास तोडून विश्वासघात
आज माणसाचा छंद झाला
नियतीकडे बघ वळून एकदा
कित्येकांच्या पापाचा घडा भरला
नैतिकता सोडूनि तू
विचारांची वाट लाविली
आरशाला विचार एकदा
माणुसकी किती दहन केली
उध्वस्त करून आयुष्य दुसऱ्यांचे
सुखकर आपले होत नाही
काही वेळ सुखाची जाईल
पण काळ डोळे लावुनी पाही
नियती येईल रूपं दाखवण्या
कारणं काय देशील तिला
कर्म तुझेच बोलू लागेल
जन्म असाच तु वाया घातला
