मजबूत महिला होऊ
मजबूत महिला होऊ
काळा काळा पासुनी महिला
मजबूरच होत राहिल्या
पण वेळ बदलली आता
लक्ष्मीबाई सावित्री हो अहिल्या
यशाकडे बघ निरखून एकदा
तुलाही तिथे जागा आहे
सहनशीलतेची ओळख तु
माया ममता डोळ्यात वाहे
तुझ्याविना सारा संसार अधुरा
सृष्टीची विधाता नको घाबरू
अडचणींना हरवूनी टाक तु
नाहकच कधी नको बावरू
मजबूत महिला होऊ सर्व
खचखळगे पार होईल तु जाग
गाजविते कोणतेही क्षेत्र
प्रत्येकी यशाचा असे तु भाग
