छत्रछाया
छत्रछाया
आई वडीलांचे
सुख प्रेम माया
मला छत्रछाया
जन्मभर
जन्मभर कष्ट
मला मिळो सुख
हीच एक भूक
मायबापा.
सुखाचे आगर
पहाडाची छाती
संकटी सांगाती
जन्मभर.
आई. बापा वाणी
जगी मूर्ती नाही
चिंतातूर राही
लेकरांच्या.
त्यांची छत्रछाया
आंबा आमराई
शितलता देई
जन्मभर.
कष्ट परिश्रम
संस्कार ठेवा
अमूल्य हा जीवा
सदोदित.
