STORYMIRROR

kusum chaudhary

Classics

3  

kusum chaudhary

Classics

गडकिल्ले

गडकिल्ले

1 min
168

गडकिल्ले रे सांगती

शिवबाची शौर्यगाथा

गडकिल्ले हे पाहून

 पायी झुकवतो माथा


शिवनेरी गडावर

शिवराय जन्म घेई

स्वराज्य हे स्थापून

इतिहास साक्ष देई


 किल्ला तोरणा जिंकून

सजे स्वराज्य तोरण

 राजधानी राजगड

रायगड किल्ले छान

 

साक्ष ही पराक्रमाची 

वध अफजलखान 

 गड प्रताप पन्हाळा

गाती पराक्रम गाण


 कावा गनिमी करून

झाली ही पावनखिंड

बाजीप्रभू पराक्रम 

साक्ष देतसे त्रिखंड


आरमार तटबंदी

मजबूत नि मोहक

फिटे पारणे डोळ्यांचे

किल्ले पाहून सुबक


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics